Navratri kanyapoojan gifts Admin
नवरात्री 2024

Navratri 2024: कन्यापूजन करताना मुलींना 'या' वस्तू द्या

नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्या पूजन केले जाते. नवदुर्गाचे प्रतीक म्हणून नऊ मुलींचे पूजन आणि त्यांना नैवेद्य केला जातो.

Published by : Team Lokshahi

नवरात्रीचा सण सर्व सणांमध्ये मोठा मानला जातो. नवरात्री नऊ दिवस नवदुर्गा आपल्या पृथ्वीतलावरती असतात. नवदुर्गाचे महत्त्व या दिवसात खूप वाढते. माता लक्ष्मी माता दुर्गा कोणत्याही रूपात तुम्हाला दर्शन देऊ शकतात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्या पूजन केले जाते. नवदुर्गाचे प्रतीक म्हणून नऊ मुलींचे पूजन आणि त्यांना नैवेद्य केला जातो. नवरात्रीत अष्टमी आणि नवमी या दोन दिवसांना महत्त्व आहे. आठव्या दिवशी केले जाणारे कन्या पूजन अनेक मार्गांनी आपले सुखाचे दरवाजे उघडते असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक जण या गोष्टी कटाक्षाने पाळतो.

कसे कराल कन्यापूजन?

अष्टमीला 9 मुलींना आमंत्रण देऊन त्यांचे कन्यापूजन करण्याची प्रथा आहे. 9 पेक्षा जास्त मुलींचेही कन्यापूजन करू शकता. मुलींना आदराने घरी बोलावून त्यांना सजवलेल्या

पाटावर बसवून त्यांचे पाय पाण्याने धुवून साफ कपड्याने पुसावे. आरती ओवाळून औक्षण करावे. हळदी, कुंकू, फुले, अक्षता वाहून त्यांचे पूजन करावे. केसांत माळायला गुलाबाचे फूल किंवा गजरा द्यावा. पूजन झाल्यावर त्यांना गोडधोड खायला घालावे. खीर-पुरी, पुरणपोळी, असे साग्रसंगीत जेवण वाढावे.

कोणत्या वस्तू देऊ शकतो?

लहान मुलींना तुम्ही कन्यापूजनासाठी वेगवेगळ्या वस्तू देऊ शकता. रूमाल, नेलपेंट, लिपस्टीक, हेअर क्लीप, ब्रेसलेट या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता. तुमचे बजेट जास्त असल्यास तुम्ही मुलींना ड्रेस, एखादा टॉप, मेकअप किट, स्कूल बॅग्स, छोट्या पर्स, पुस्तके, वह्या, अभ्यासाचे साहित्य या सारख्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड